शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

कविता

माझ्यातला मी मला नेहमी सांगायचो...
एक दिवस तुमच्या नात्यात वादळ येईल;
त्यावेळी ती पाऊल मागे घेईल.

तुझ्या बाजूने ती फक्त शब्दात असेल;
वादळात मात्र तू एकटा तुटशील...

पण माझ्यातलं मन आधी मानलं नाही...
शेवटी मी परका, हे भोळ्या मनाने कधी जाणलं नाही...

बरं झालं छोट्याश्या लाटेमुळेच तू पाऊल मागे घेतलंस.

तुझा हात धरून वादळाशी भिडण्याची स्वप्ने मी येथेच गुंडाळतो;
ह्यापुढे माझ्यातला मी आणि माझं कधीही न मानणारं मनं मीच साभांळतो…

30/11/2017


स्वप्नांचा ह्रास

तुझाचसाठी जगत होतो तरी  तू मला फसवलं
मी तुला ह्रदयात बसवलं  माझं जीवन तुझ्याच स्वप्नात वसवलं।

तुच माझं  विश्व आहे असं मला वाटलं
माझं प्रेम तितकंच आहे तुझं प्रेम मात्र आटल।

तू सोडून गेल्यावर मी माझा ह्रदयाच दार गाठलं
तुझा विरहाच्या दुःखाने माझा डोळ्यात पाणी दाटल।

तुझ्याबरोबर जगण्याचा केला होता अट्टाहास
तूच होत माझं जीवन तूच माझा होता श्वास।

तुजवीण   जगण्याचा  होतोय  मजला  त्रास
का घडवला माझा स्वप्नांचा असा ऱ्हास ।

पुरे झाला हा भावनांचा  छळ
कोणासमोर मांडू मी माझा जीवाची ही तळमळ।

तन्मय पाटील

28 / 11/2017

 वसई संस्कृती एकात्मतेशी*

 वसई संस्कृती एकात्मतेशी

कुदळ पावडॉ घ्यावॉंन भाटात  खप्याशे आपलॅ  बाप दादा ।
कुदळ पावडें  गेलॅ आते घेटली  मोबाईल लॅपटॉपने त्यायी जागा ।।

एका घरात एक कुटुंब भुगून पन्नास  जणे  ऱ्याशे।
खादो कमिस हॉता तरी एकमेक एकत्र खाशे प्याशे।।

बॉठो बॉठो पगार मिळया लागल्योर
फुटलॅ जुने  वाडे ।
बुलेट (गाडी)सॉ आलॉ माज भाहालॅ जुने बैल गाडे।।

आते वीस लाखाश्या काँक्रेट  बंगल्यामीने शारजण रेत्यात।
पण लॅपटॉप मोबाईल टीव्ही मिनेस अहत्यात।।

पॉर बापाला विसारी नाय
भाहा  भाहाला भालॉ ।
आपली संस्कृती विहरलॅ
वसईत पाश्चिमात्य वारॉ आलॉ।।

माहणाला माहणाहरी जोडणारी आपली वसईशी संस्कृती हाय महान।
सला, वसईसा वैभव टिकव्याकरता द्याऑ  जकल्याना मान।।

:- तन्मय पाटील

29/07/2017