वसई संस्कृती एकात्मतेशी
कुदळ पावडॉ घ्यावॉंन भाटात खप्याशे आपलॅ बाप दादा ।
कुदळ पावडें गेलॅ आते घेटली मोबाईल लॅपटॉपने त्यायी जागा ।।
एका घरात एक कुटुंब भुगून पन्नास जणे ऱ्याशे।
खादो कमिस हॉता तरी एकमेक एकत्र खाशे प्याशे।।
बॉठो बॉठो पगार मिळया लागल्योर
फुटलॅ जुने वाडे ।
बुलेट (गाडी)सॉ आलॉ माज भाहालॅ जुने बैल गाडे।।
आते वीस लाखाश्या काँक्रेट बंगल्यामीने शारजण रेत्यात।
पण लॅपटॉप मोबाईल टीव्ही मिनेस अहत्यात।।
पॉर बापाला विसारी नाय
भाहा भाहाला भालॉ ।
आपली संस्कृती विहरलॅ
वसईत पाश्चिमात्य वारॉ आलॉ।।
माहणाला माहणाहरी जोडणारी आपली वसईशी संस्कृती हाय महान।
सला, वसईसा वैभव टिकव्याकरता द्याऑ जकल्याना मान।।
:- तन्मय पाटील
29/07/2017
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा