शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

कविता

माझ्यातला मी मला नेहमी सांगायचो...
एक दिवस तुमच्या नात्यात वादळ येईल;
त्यावेळी ती पाऊल मागे घेईल.

तुझ्या बाजूने ती फक्त शब्दात असेल;
वादळात मात्र तू एकटा तुटशील...

पण माझ्यातलं मन आधी मानलं नाही...
शेवटी मी परका, हे भोळ्या मनाने कधी जाणलं नाही...

बरं झालं छोट्याश्या लाटेमुळेच तू पाऊल मागे घेतलंस.

तुझा हात धरून वादळाशी भिडण्याची स्वप्ने मी येथेच गुंडाळतो;
ह्यापुढे माझ्यातला मी आणि माझं कधीही न मानणारं मनं मीच साभांळतो…

30/11/2017


स्वप्नांचा ह्रास

तुझाचसाठी जगत होतो तरी  तू मला फसवलं
मी तुला ह्रदयात बसवलं  माझं जीवन तुझ्याच स्वप्नात वसवलं।

तुच माझं  विश्व आहे असं मला वाटलं
माझं प्रेम तितकंच आहे तुझं प्रेम मात्र आटल।

तू सोडून गेल्यावर मी माझा ह्रदयाच दार गाठलं
तुझा विरहाच्या दुःखाने माझा डोळ्यात पाणी दाटल।

तुझ्याबरोबर जगण्याचा केला होता अट्टाहास
तूच होत माझं जीवन तूच माझा होता श्वास।

तुजवीण   जगण्याचा  होतोय  मजला  त्रास
का घडवला माझा स्वप्नांचा असा ऱ्हास ।

पुरे झाला हा भावनांचा  छळ
कोणासमोर मांडू मी माझा जीवाची ही तळमळ।

तन्मय पाटील

28 / 11/2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा