शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व

                  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे हिंदुत्व

                      

           हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व 
                                           :-स्वा.वि.दा.सावरकर

      सध्या तथाकथित पुरोगामीचे पिक मोठ्याप्रमाणात उगवलेल आहे. बुद्धीजीवी, समाजवादी असे सर्व  शब्द कानावर पडत असतात . देशात वाढलेली असहिष्णुतेला विरोध करण्यासाठी हे सर्व सेक्युलर लोक पुढे येत असल्याचा आव आणत आहेत. हे सर्व घडत असताना सावरकर हे नाव हि निघत असताना दिसते . मग पुरोगामी आपल्या स्वार्थ साधण्यासाठी ,तसेच राजकीय पक्ष राजकारणासाठी सावरकरांचे नाव घेताना दिसतात. कोणी म्हणत सावरकर राष्ट्रभक्तनसून धर्मांद होते, तर कोणी म्हणत सावरकरांनी देशासाठी काय केल आहे? त्यात भर ती ‘बि’ग्रेडी बुद्धीजीवींची. हे स्वयम घोषित इतिहासकार खोटा इतिहास लिहून जातीय द्वेष पसरवताना दिसत आहेत.
   परंतु सावरकरांचे हिंदुत्व हे धर्मावर आधारित नसून राष्ट्रवादावर आधरलेलं आहे.  अंदमानच्या तुरुंगात  काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना काही मुसलमान कैदी म्हणून अंदमानात येत ते  त्यांनी खिलापत चळवळीचे प्रतिनिधित्व केल्यामुळे. आमच्या खलिफा विरुध्द युद्ध करण्याचा प्रयत्न ब्रिटन करूच कसा शकतो हा त्या मुसलमानाचा समज होता त्यासाठी त्यांनी खिलापत चळवळ हाती घेतली होती  हि गोष्ट सावरकरांच्या मनाला खटकत असे. कारण हा खलिफा  प्रश्न भारतीय मुसलमानांसाठी राष्ट्रीय नव्हता तर धार्मिक होता. कारण तुर्कस्तानचा खलिफा त्याचा धार्मिक राजा होता , कोण कुठला तुर्कस्तान कुठला तो खलिफा त्याच्या विषयी ह्यांच्या मनात इतक प्रेम व त्यासाठी आपल संपूर्ण आयुष्य अर्पण करण्यास तयार , परंतु आपली जन्मभू ,मात्रुभू , माझादेश पारतन्त्र्यात खितपत आहे त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आपण काही तरी कराव अस त्यांना किंचितही वाटत नाही हे  पाहून सावरकरांना दुखः होत असे.कारण भारतापेक्षा तुर्कस्थान त्यांना पुण्यभूमी वाटते व तुर्कस्थानचा खलिफा त्यांच्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचा वाटतो. ह्यातूनच पुढे मोपल्याचे बंड सारखे प्रकार घडले व खिलापत चळवळीचे रुपांतर भयानक हिंसेत होऊन मलबार मधील मुसलमानांनी हिंदुवर अत्याचार केले. ह्याच विचाराने व्याकुळ  पुढे सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहला, त्या ग्रंथाची रूपरेषा अंदमानातील तुरुंगातच तयार केली व तुरुंगातून बाहेर येताच रत्नागिरीत  हा ग्रंथ लिहुन पूर्ण केला. आधुनिक भारतात  राष्ट्रीय हिंदुत्वाचे तत्वज्ञान मांडणारे स्वतंत्र्यवीर सावरकर पहिले तत्वज्ञ होत. 
                आसिंधु सिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका |
                पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः|| 

    ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारत भूमी आहे तो हिंदु. जो सिंध पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची सर्वभूमी हि पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदु. ह्या देशात जोजो राहतो व ज्याचे ज्याचे पूर्वज भारतात जन्मले आयुष्य जगले आणि मृत्यू पावले त्या सार्वांची पितृभूमी हि भारत भूमीच आहे.परंतु केवळ पितृभूमी भारत भूमी असल्याने कोणी हिंदु होऊ शकत नाही पितृभूमी बरोबरच ज्याची पुण्यभूमी हि भारत आहे तो हिंदु.  ह्या व्याखेनुसार ज्याज्या पंथांचा उदय भारतात झाला आहे त्यात्या पंथाचे अनुयायी हिंदु आहेत. उदा :- वैदीक, बौध्द, जैन , शीख , लिंगायत ,आर्यसमाजी हे सारे  हिंदु होत .कारण ह्या सर्वांचे पूर्वज भारतच जीवन जगले असल्यामुळे  ह्या सर्वांची पितृभूमी भारत आहेच त्याच बरोबर ह्या सर्व पंथाचा उदय भारतात झाला असून ह्या पंथातील अनुयायी वर्गाची पुण्यभूमी (holyland) भारत आहे .परंतु  ह्यामध्ये क्रिस्ती मुस्लीम व पारशी ,ज्यू ह्या पंथांचा समावेश सावरकरांनी केलेला नाही आहे. कारण क्रिस्ती तसेच मुसलमानांचे पूर्वज ह्याच राष्ट्रात जन्मले म्हणून त्यांची पितृभूमी भारत आहे  परंतु  आज हि आपण एखाद्या क्रिस्ती युवकास विचारल की जगात सर्वात पवित्र काय आहे तर ते चटकन रोम म्हणतील , किंवा एखाद्या मुसलमानास विचारल की ह्या जगात पवित्र काय आहे तर तो चटकन मक्का सांगेल. म्हणून त्यांची पुण्यभूमी भारत नसल्याने ते हिंदु ठरत नाहीत. 
            खर पाहिलतर भारत हा सर्व समावेशक राष्ट्र आहे. दोन सहस्त्र पेक्षा जास्त वर्षाच्या काळापासून अनेक धर्म व पंथ भारतात जन्मास आले तसेच अनेक पंथ परदेशातून भारतात आले त्या सर्व पंथांना भारतानी सामावून घेतले. परंतु परदेशातून भारतात आलेले काही पंथ राष्ट्रीयत्वाला घातक ठरले. ज्यू तसेच पारशी भारतात आले राहिले परंतु त्यांनी त्यांच्या पंथ वाढविण्याची महत्वकांक्षा मनात धरली नाही व ते भारतीय संस्कृतीस अनकूल झाले व हिंदु संस्कृतीने त्यांना सामावून घेतले .परंतु मुसलमान किंवा क्रिस्ती पंथ ह्या मातीच्या संस्कृतीशी सामावून न घेता परकीय संकृती ह्या देशात लादण्याचा प्रयत्नात राहिले. ह्यातूनच पुढे विलप्त राष्ट्रवादाची भूमिका वाढीस लागली व ज्यांची पुण्यभूमी भारत भूमि नाही त्यांनी वेगळ्या राष्ट्रची मागणी केली. पाकिस्तान हे ह्यांचे सर्वात मोठे उदाहरण होते कारण सिंध, पंजाब, पूर्व बंगालमधील लोकांच्या पूर्वजांची पितृभूमी आसिंधु-सिंधूच होती परंतु हि आसिंधु-सिंधू पुण्यभूमी नसल्याने विलप्त राष्ट्रवाद वाढीस लागला व पाकीस्थानच्या मागणीचा जोर वाढीस लागला व भारतातून विलप्त होण्यासाठी त्यांनी अनेक भयानक प्रकारही चालवले . व तोच पाकिस्तान भारताला आजही   त्रासदायक ठरत आहे. व भविष्यात हि ठरत राहील .  गेल्या सात दशकापासून चालू असलेला काश्मीरचा विषय  सुद्धा ह्याच प्रश्नाचा एक भाग आहे . अर्धा काश्मीर पाकिस्थानच्या ताब्यात आहे आणि जो काश्मिर आपल्या ताब्यात आहे तेथील मुसलमान  विलप्त काश्मीरची मागणी करत आहेत  किंवा पाकिस्थानात समाविष्ट होण्याचा मानस दाखवत आहेत .  ह्याच बरोबर दुसरे उदाहरण देता येते ते ईशान्यभारतातील नागालँड ह्या राज्याचे. स्वा. सावरकरांनी श्रद्धानंद मध्ये ९-८-१९३१ह्या दिवशी एक लेख लिहला होता त्या लेखाचे शीर्षक “हिंदु नाग लोक क्रिश्चन का होतात?” हा प्रश्न सावरकर हिंदु जनतेला , हिंदुपंडितांना , तत्कालीन शंकराचार्य वल्लभाचार्य ह्यांना विचारतात , मिशनरी इथे सातासमुद्रापार येतात धर्मप्रसार करतात ते काय मूर्ख आहेत?? केवळ धर्म प्रसार हा त्यांचा हेतू नसून ह्याच्यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे . असे सावरकरांचे म्हणणे होते. ह्या लेखातून सावरकर हिंदुधर्मातील धर्मगुरूंना नागालँडमध्ये जाऊन नागा लोकांना हिंदुधर्माच्या छत्रछायेत घेण्याचे आवाहन करत आहेत. परंतु हिंदु समाजाची इतिकी दूरदृष्टी नव्हती पुढे ८०च्या दशकात सावरकरांनी दिलेला इशारा खरा ठरला आणि नागालँडमधील ९०% पेक्षा जास्त लोकसंख्या क्रिस्ती होऊन विलप्त राष्ट्रवाद उदयास आला . व त्यासाठी दहशदवादीकारवाया सुद्धा होऊ लागल्या.
 
   म्हणजेच सावरकरांच हिंदुत्व उपासनापद्धत पाहत नाही , ते आध्यात्मिक तसेच धार्मिकश्रद्धेला धरून ही नाही आहे. तर ते हिंदु नावाच्या लोकांचे न्यायहक्करक्षण करण्यासाठी व भारताचे राष्ट्रीयत्व राखण्यासाठी आहे  .तुम्ही वैदिक ,भारतीय बौध्द ,जैन ,शिख ,लिंगायत ब्राम्होसमाजी ,आर्यसमाजी इतकंच काय जडवादी चर्वाक असाल तरी तुम्ही हिंदूच ठराल . तसेच मुस्लीम तसेच क्रिस्ती हे जरी सावरकरांच्या हिदुत्वाच्या व्याख्येत बसत नसले  तरी काही अपवाद मात्र दिसून येतात उदाहरणार्थ भारताचे महान वैज्ञानिक तसेच माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दूल कलाम हे सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदूच ठरतात. कारण ते जन्माने जरी मुसलमान असले तरी त्यांची पितृभूमी हि भारत आहे तसेच ह्या देशावर त्यांनी  पुण्यभूमी समजून प्रेम केल तसच आपल संपूर्ण आयुष्य अर्पण केल. म्हणूनच पितृभूमी व पुण्यभूमीच्या व्याख्येनुसार ते हिंदुच ठरतात. म्हणूनच  सावरकरवादी हिंदुत्व हे राष्ट्रवादाचे खरे प्रतिक आहे . कारण जो ह्या भारत भूमीला पितृभूमी म्हणून तसेच पुण्यभूमी समजून प्रेम करेल तो हिंदुच ठरेल. तसेच त्याचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीयत्व ठरेल .

      वन्दे मातरम                             
                                    

                                    तन्मय पाटील
                                
                        भ्रमण ध्वनी क्र. :- 9049455619/ 8850505942

                  Email ld :-Tanmaypatil.patil81 @Gmail.com

        

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

भारतीय भाषा मरणोन्मुखशय्येवर, लेखांक 2

     भारतीय भाषा (मराठी, हिंदी आदी ) मरणोन्मुखशय्येवर  

लेखांक:2
तन्मय पाटील
   
               एका अक्षराचा एकच उच्चार आणि एका उच्चारास एकच अक्षर हे लिपी शुद्धीचे गमक आहे.
      :- स्वातंत्र्यवीर सावरकर   
             
                देवनागरी हि भारतात वापरली जाणारी पौराणिक लिपी पध्दत आहे . संस्कृत आणि त्यातून उत्पन्न झालेल्या सर्व भाषा ह्या देवनागरी लिपीतच लिहल्या जात असतात.(हिंदी मराठी गुजराती ...आदी.) परंतु मुस्लिम राजवटीच्या काळात अरबी आणि पर्शियन भाषेतील काही शब्दांचा संस्कृतनिष्ठ हिंदी भाषेत प्रवेश झाला आणि उर्दूची उत्पत्ती झाली. हिंदी भाषेत म्लेंछ बाधित अरेबीयक शब्द घुसवून अरेबियन लिपीत लिहली जाणारी दुषित भाषा म्हणजे उर्दू . पुढील काळात  पोर्तुगीज, डच, इंग्रज आदी; युरोपियन राष्ट्र भारतात आली . आणि रोमन (इंग्लिश) लिपीचा भारतात प्रवेश झाला. 
              परंतु आज भारतात इंग्रजी लिपीचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे . सर्व ठिकाणी लावण्यात येणारे फलक हे इंग्रजी लिपीतच लिहिलेले आढळतात तसेच औद्योगिक क्षेत्रात व्यवहारासाठी इंग्रजी लिपीचाच वापर होतो . परंतु प्रतेक्षात मात्र उपयोगात आणण्यासाठी आपली देवनागरी लिपी श्रेष्ठ आहे . कारण देवनागरी लिपीत एका अक्षराचा उच्चार एकच होत . उदा:- जर आपण “क” हे अक्षर लिहले त्याचा उच्चार “क” असाच होतो आणि जर आपण “स” हे अक्षर लिहले तर त्याचा उच्चार “स” असाच होतो . ह्या उलट इंग्रजी भाषेत CINEMA(सिनेमा) ह्या शब्दासाठी “c” ह्या अक्षराचा उच्चार “स” असा होतो . तर CAT(कॅट) ह्या शब्दासाठी “c” ह्या अक्षराचा उच्चार “क” असा होतो .  देवनागरीत “अ” ह्या अक्षराचाचा उच्चार “अ” तसेच “आ” ह्या अक्षराचा उच्चार “आ” असा होतो. ह्या उलट इंग्रजीतील A ह्या अक्षराचा उच्चार कधी अ, कधी आ, तर कधी अॅ असा कसाही होत असतो. 
    देवनागरीत एका शब्द उच्चारण्यासाठी जितके अक्षर वापरले जातात लिहण्यासाठीही तेवढेच अक्षर  वापरण्यात येतात. ह्या उलट इंग्रजी लिपीत त्याच ४ अक्षराच्या शब्दासाठी ८ ते १० अक्षर लिहावी लागतात . उदा: कमिशन हा शब्द  बोलताना आपण चार अक्षरचा उच्चार करतो. तसेच कमिशन लिहतानाही देवनागरीत चार अक्षरच लिहतो, इंग्रजीत मात्र (cammission) ४ अक्षरांनाच्या शब्दासाठी १० अक्षर लिहावी लागतात. “क्ष” हे देवनागरीलिपीतील तील एक अक्षर  लिहण्यासाठी इंग्रजी लिपीत “ksh” तीन अक्षर  लिहावी लागतात म्हणून  क्षितिज हे तीन नाव इंग्रजी लिपीत लिहायचे असल्यास (kshitij) तीन एवजी सात अक्षर खर्ची होतात. हाच फरक आहे युरोपियन आणि भारतीय लिपीमध्ये. देवनागरीत आपण जेवढी अक्षर बोलतो तेवढीच आणि तीच  लिहावी लागतात. म्हणून देवनागरी लिपी इतर लिपी पद्धतीपेक्षा शास्त्रीयदृष्ट्या उच्च आणि श्रेष्ठ  दर्ज्याची आहे तसेच जागतिक व्यवहारात उपयोगात आणण्यासाठी अनुकरणीय आणि सोयीस्कर आहे.
  

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

भारतीय भाषा मरणोन्मुखशय्येवर

भारतीय भाषा (मराठी,हिंदी, इत्यादी.) मरणोन्मुखशय्येवर 
लेखांक :१ 
तन्मय पाटील 
ज्यात स्वत्व राहते, तेच स्वराज्य(आपलेराज्य) होय .
:- स्वातंत्र्यवीर सावरकर
१२ मे रोजी आमच्या गावात मंदिराचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला त्यावेळी भाषण देताना एक गृहस्त म्हणाले की कामाकरिता चीनला गेलो होतो . परंतु तेथील लोकांशी संपर्क करण्यासाठी मला चीनी भाषा शिकावी लागली आणि मि ती शिकलो . त्यांची शिकण्याची प्रवृत्ती पाहून सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केल . मीही टाळ्या वाजवत होतो टाळ्या वाजवत असताना मनात प्रश्न उपस्थित झाला , की त्यांना चीनी भाषा का शिकावी लागली कारण चीन मध्ये व्यहारिक जीवनात त्यांची स्वकीय भाषाच वापरण्यात येते म्हणूनच ना .हीच स्थिती जपान, फ्रांस, जर्मनी देशात आहे. कितीही झाले तरी ते आपली स्वतःची भाषा सोडून इतर भाषेचा वापर करत नाहीत. या उलट आपली स्थिती, परदेशी लोकांबरोबर तर राहूनच द्या परंतु दोन भारतीय जरी आपसात बोलत असलो तरी आपल्या मराठी, हिंदी ह्या भाषांचा वापर न करता इंग्रजी (english) भाषेचा वापर करतो . एका इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या तरुणाने माझ्याजवळून सावरकरांचे एक पुस्तक वाचण्यासाठी घेतले . तेच पुस्तक तो दोन तासांनी घेऊन आला आणि म्हणाला हे घे तुझ पुस्तक मि वाचू नाही शकलो कारण किती कठीण भाषा आहे हि, ह्या पुस्तकातील काही शब्दांचा अर्थ लावणे हि कठीण आहे .इतकी कठीण मराठी मला समजत नाही !!??
आपल्याच मातृभाषेची आपणच हि दुर्दशा करून घेतली आहे आहे अस नाही वाटत आपल्याला ??? मुळात शिवाजी महाराज की जय!!! अस आपण म्हणतो कशाला ?? ज्यांनी हिंदूचा स्वाभिमान जागा केला ते शिवाजी . जर आपल्याला आपल्या स्वभाषेविषयी अभिमानच नसेल तर त्या जय ला कीती महत्व राहत . स्वराज्य म्हणजे काय फक्त राजकीय नव्हे तर राजकीय ,सांस्कृतिक, सामाजिक सर्व प्रकारचे स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य !!! पण आज आपण भाषेच्या दृष्टीकोनातून स्वातंत्र्य आहोत का ??? का इंग्रज जाऊन आज ७० वर्ष होऊन भाषेच्या बाबतीत पारतन्त्र्याच्या बेड्यात अडकलो आहोत ? इंग्रजी भाषा आपल्या मेंदूवर आणि मनावर राज्य करत आहे. इंग्रजी भाषेचे आपल्या स्वकीय भाषेवरील आक्रमण बघता पुढील १०० वर्षात आपल्या भाषा नष्ट होण्याचा धोका संभवतो. जर असेच चालू राहिले तर आपली राष्ट्रभाषा आणि आपल्या मातृभाषा नष्ट होतील . आणि आज जश्या आपल्या संस्कृत , पाली आदी पुरातन भाषा सौशोधनाचा विषय झाला आहे तीच परिस्थिती आजच्या आपल्या भाषांवर हि येईल . आणि इंग्रजी आपली भाषा होऊन राहील. 
आज वित्त (पैसा) कमविण्यासाठी इंग्रजी भाषाच उपयोगी पडते हे सत्य आहे . त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण देण्याचा पालकांचा कल असतो . हि गोष्ट जरी मान्य केली तरी आपली मातृभाषा (मराठी) आणि राष्ट्रीय भाषा(हिंदी) टिकवणे आपले नैतिक कर्तव्य आहे . कारण ह्या भाषा आपल्या प्राचिन संस्कृत मधून निर्माण झाल्या असून ह्या भाषा आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाच नव्हे तर राष्ट्रीय वारसा सुद्धा आहे . आणि आपण समजतो तश्या आपल्या भाषा ह्या इंग्रजीपेक्षा हीन किंवा कमी दर्ज्याच्या नसून शास्त्रीयदृष्ट्या इंग्रजीपेक्षा प्रगत भाषा आहेत . आपल्या भाषा आणि आपली देवनागरी लीपी जगात सर्वश्रेष्ठ आहे.
क्रमशः........

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

.....आणि अलेक्झांडर(सिकंदर) भारतीय सैन्यास पाठ दाखवून पळून गेला!!!

.....आणि अलेक्झांडर(सिकंदर) भारतीय सैन्यास पाठ दाखवून पळून गेला!!!

अन्य कुणाचा असो सिकंदर परंतु भारतजेत्ता ना |
अंगणहि ना तये देखिले कळलाना कुणाकुणा ||
(गोमांतक) स्वतंत्र्यवीर सावरकर

   अलेक्झांडरची भारतावर स्वारी इसवी सन पूर्व ३२७मध्ये झाली. त्याकाळी इंग्लंड, जर्मनी, फ्रांस हि राष्ट्रे अस्तित्वात सुद्धा आली नव्हती. युरोपात ग्रीक एकमेव प्रगत राष्ट्र अस्तीत्वात होत. ग्रीकमध्ये लहान लहान नगररराज्ये नांदत होती. त्यात अथेन्स, स्पाटॆा हि प्रगत राज्य होती. परंतु ग्रीक मधील मासेडोनियाचा राजा फिलिप यानी म्ह्त्वाकांक्षेच्या जोरावर ती राज्ये जिंकली. आणि तो मरण पावला त्यच्या पश्च्यात त्याचा मुलगा अलेक्झांडर राजगादीवर विराजमान झाला. अलेक्झांडर आपल्या पित्यापेक्षा शतपटीने महत्त्वाकांक्षी होता. सर्व ग्रीक सैनिकांना एकत्र करून ग्रीकसाम्राज्याच्या शेजारी असलेल्या पारसिक (इराण) साम्राज्यावर चालून गेला.ग्रीक साम्राज्याच्या शिस्तबद्ध आणि संघटीत सैन्यापुढे पारसिक सम्राट दरायस आणि पारसिकसैन्यानी क्षरणागती पत्करली, आणि पारसिक राज्याची राजधानी जिंकून स्वतः पारसिक साम्राज्याचा सम्राटपदी विराजमान झाला. पारस साम्राज्य जिंकल्याबरोबर आपण संपूर्ण जग जिंकू शकू अशी भावना त्याच्या मनात उत्पन झाली आणि पारस देशच्या शेजारी असलेला भारतखंडावर राज्य करण्याची तृष्णा उत्पन झाली.
त्याकाळी भारताची व्याप्ती सिंधू नदीच्या पलीकडे इराणच्या सीमेपर्यंत होती. हिंदुलोकांची वस्ती हिंदुकुश पर्वतापर्यंत पसरलेली होती. आज आपण ज्याला अफगाणीस्तान म्हणतो त्याला त्या काळी गंधार म्हणत. “अहिगणस्थान” हे अफगाणिस्तानचे आपले जुने नाव होते.काबुलनदीचे जुने नाव कुभा होते. हिंदुकुशपर्वतापर्यंत भारतीयांची लहान मोठी राज्य वसलेली होती त्यातली काही प्राजके होती त्यांना गणराज्ये म्हणत, बहुतेक राज्ये हि प्रजासत्ताक गणराज्यच होती. राज्यसत्ताक राज्य दोन तीनच होती. त्यातल सर्वात मोठ राज्य पौरस राजाच होत. अलेक्झांडरला पारस आणि भारतीय लोक सिकंदर म्हणून ओळखत असत हा अलेक्झांडर सर्वात प्रथम तक्षशीलेवर चालून आला. तक्षशीलेचा राजाअंबुज युध्द न करताच क्षरण आला .
पौरसाचे राज्य:
त्यानंतर अलेक्झांडर पौरसराज्यावर चालून आला आणि त्यानी पौरस राजास शरण येण्याचा आदेश सोडला परंतु पौरस राज्यानी त्याचा आदेश धुडकावून लावला . आणि अलेक्झांडरला युद्धास सज्य होण्यास सांगितले. अलेक्झांडर आणि पौरसराज्याच्या युद्धात पौरस राजाच्या सैन्याचा भर युद्धरथांवर आणि हत्तीवर होता तर अलेक्झांडरकडे चपळ घोडदळ होते. त्यात युद्ध चालू होताच पाऊस पडू लागला.त् आणि नदीला पूर आला त्यामळे पौरव राज्याचे सैन्याच्या रथांची चाक चिखलात रुतु लागली तसेच हत्तींना हि पुढे जाण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे पौरवाचा दुर्द्य्वी पराभव झाला.
मालाव आणि शूद्रक गणराज्ये :
हि दोन्ही लहान लहान गणराज्ये होती त्या राज्यातील प्रमुखाची निवड लोकमतानी होत असे. मालाव आणि शुद्र्क हि गण राज्ये सिंधू नदीच्या तीरावर वसली होती . पौरवाचा पराभव केल्यानंतर अलेक्झांडर मालव आणि शुद्र्क राज्यान जवळ वळाला परंतु तेव्हा हि राज्य युद्धासाठी तयार असल्याचे तसेच हे तर हिंदु भूमीचे अंगण आहे ह्या राज्यांपेक्षा मोठमोठी राज्य गंगा नदीच्याकाठी वसली आहेत आणि त्यांची मोठमोठी सैन्य लढण्यासाठी सज्य असल्याचे अलेक्झांडरच्या सैन्याला समजले. आणि हे समजताच त्याच्या सैन्यानी धास्ती खाली. तरीही अलेक्झांडर त्या मालव आणि शूद्रक राज्यांवर युद्ध करण्यास चालून गेला दोन्ही पक्षात तुंबळ युद्ध चालू असताना एका भारतीय शूर सैनिकाने मारलेला एक विषारी बाण जाऊन अलेक्झांडरला लागला.आणि तो जागीच कोसळला त्या बाणाने अलेक्झांडर घायाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत गेला परंतु त्याचे प्राण मात्र वाचले. त्यानंतर तो काही काळ अंथरुणावर खिळून होता .तसेच अलेक्झांडरचे सैन्य सतत च्या युद्धामुळे थकुन गेल होत आणी भारतीय सैन्याचे शौर्य पाहुन निराश झाल होत. आता आपल्याला भारत जिंकण शक्य नाही हे अलेक्झांडरला कळून चुकल आणी ह्या युद्धात तो विजय न मिळवताच मागे फिरला आणि मासागा येथे छापा टाकून सिंधु सागरातून (अरबीसमुद्र) जलमार्गाने पारसला(इराण) पळून गेला. अलेक्झांडरला म्हणजेच सिकंदरला वाटले होते कि आपण पारससाम्राज्याप्रमाणेच भारतालाही जिंकू शकू परंतु त्याचे हे स्पप्न पूर्ण झाले नाही आणि तो भारताच्या अंगणातूनच भारतीय सैन्याला पाठ दाखवून पळून गेला. म्हणून अलेक्झांडर(सिकंदर) जगतजेत्ता नव्हताच !! भारतजेत्ता तर नव्हताच नव्हता !!!
वंदे मातरम !! अखंडहिंदुस्थान अमर रहे!!!
तन्मय पाटील
सौजन्य : (सहा सोनेरी पाने) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर