भारतीय भाषा (मराठी,हिंदी, इत्यादी.) मरणोन्मुखशय्येवर
लेखांक :१
तन्मय पाटील
ज्यात स्वत्व राहते, तेच स्वराज्य(आपलेराज्य) होय .
:- स्वातंत्र्यवीर सावरकर
१२ मे रोजी आमच्या गावात मंदिराचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला त्यावेळी भाषण देताना एक गृहस्त म्हणाले की कामाकरिता चीनला गेलो होतो . परंतु तेथील लोकांशी संपर्क करण्यासाठी मला चीनी भाषा शिकावी लागली आणि मि ती शिकलो . त्यांची शिकण्याची प्रवृत्ती पाहून सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केल . मीही टाळ्या वाजवत होतो टाळ्या वाजवत असताना मनात प्रश्न उपस्थित झाला , की त्यांना चीनी भाषा का शिकावी लागली कारण चीन मध्ये व्यहारिक जीवनात त्यांची स्वकीय भाषाच वापरण्यात येते म्हणूनच ना .हीच स्थिती जपान, फ्रांस, जर्मनी देशात आहे. कितीही झाले तरी ते आपली स्वतःची भाषा सोडून इतर भाषेचा वापर करत नाहीत. या उलट आपली स्थिती, परदेशी लोकांबरोबर तर राहूनच द्या परंतु दोन भारतीय जरी आपसात बोलत असलो तरी आपल्या मराठी, हिंदी ह्या भाषांचा वापर न करता इंग्रजी (english) भाषेचा वापर करतो . एका इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या तरुणाने माझ्याजवळून सावरकरांचे एक पुस्तक वाचण्यासाठी घेतले . तेच पुस्तक तो दोन तासांनी घेऊन आला आणि म्हणाला हे घे तुझ पुस्तक मि वाचू नाही शकलो कारण किती कठीण भाषा आहे हि, ह्या पुस्तकातील काही शब्दांचा अर्थ लावणे हि कठीण आहे .इतकी कठीण मराठी मला समजत नाही !!??
आपल्याच मातृभाषेची आपणच हि दुर्दशा करून घेतली आहे आहे अस नाही वाटत आपल्याला ??? मुळात शिवाजी महाराज की जय!!! अस आपण म्हणतो कशाला ?? ज्यांनी हिंदूचा स्वाभिमान जागा केला ते शिवाजी . जर आपल्याला आपल्या स्वभाषेविषयी अभिमानच नसेल तर त्या जय ला कीती महत्व राहत . स्वराज्य म्हणजे काय फक्त राजकीय नव्हे तर राजकीय ,सांस्कृतिक, सामाजिक सर्व प्रकारचे स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य !!! पण आज आपण भाषेच्या दृष्टीकोनातून स्वातंत्र्य आहोत का ??? का इंग्रज जाऊन आज ७० वर्ष होऊन भाषेच्या बाबतीत पारतन्त्र्याच्या बेड्यात अडकलो आहोत ? इंग्रजी भाषा आपल्या मेंदूवर आणि मनावर राज्य करत आहे. इंग्रजी भाषेचे आपल्या स्वकीय भाषेवरील आक्रमण बघता पुढील १०० वर्षात आपल्या भाषा नष्ट होण्याचा धोका संभवतो. जर असेच चालू राहिले तर आपली राष्ट्रभाषा आणि आपल्या मातृभाषा नष्ट होतील . आणि आज जश्या आपल्या संस्कृत , पाली आदी पुरातन भाषा सौशोधनाचा विषय झाला आहे तीच परिस्थिती आजच्या आपल्या भाषांवर हि येईल . आणि इंग्रजी आपली भाषा होऊन राहील.
आज वित्त (पैसा) कमविण्यासाठी इंग्रजी भाषाच उपयोगी पडते हे सत्य आहे . त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण देण्याचा पालकांचा कल असतो . हि गोष्ट जरी मान्य केली तरी आपली मातृभाषा (मराठी) आणि राष्ट्रीय भाषा(हिंदी) टिकवणे आपले नैतिक कर्तव्य आहे . कारण ह्या भाषा आपल्या प्राचिन संस्कृत मधून निर्माण झाल्या असून ह्या भाषा आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाच नव्हे तर राष्ट्रीय वारसा सुद्धा आहे . आणि आपण समजतो तश्या आपल्या भाषा ह्या इंग्रजीपेक्षा हीन किंवा कमी दर्ज्याच्या नसून शास्त्रीयदृष्ट्या इंग्रजीपेक्षा प्रगत भाषा आहेत . आपल्या भाषा आणि आपली देवनागरी लीपी जगात सर्वश्रेष्ठ आहे.
क्रमशः........
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
भारतीय भाषा मरणोन्मुखशय्येवर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
इंग्रजी काळाची गरज आहे, आणि मराठी किंवा कोणतीही भारतीय भाषा समाजाची गरज आहे. उत्तम लेख.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामाझी इंग्रजी बद्दल इतकी तक्रार नाही..जितकी हिंदीबद्दल आहे.. मराठी भाषेला सर्वाधिक धोका असणारी भाषा हि हिंदी आहे इंग्रजी नाही. असे मला वाटते
उत्तर द्याहटवापण आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकण्यास पाठवतो इंग्रजीचा आपल्या तरुण पिढीवर खूप प्रभाव आहे. त्यांना आपली देवनागरी लिपी वाचायला हि त्रास होतो . हे मी अनुभवल आहे . मग मराठी काय हिंदी काय किवा बंगाली गुजराती ह्या भाषा सुद्धा मरण कळेवर येऊन पोहचले आहेत.
हटवाआजची परिस्तिथी पहिली तर असे वाटते की भविष्यात मराठी सारख्या इतर भारतीय भाषा,मृत भाषा होतील जी आज संस्कृत भाषेची अवस्था आहे.
उत्तर द्याहटवाआजची परिस्तिथी पहिली तर असे वाटते की भविष्यात मराठी सारख्या इतर भारतीय भाषा,मृत भाषा होतील जी आज संस्कृत भाषेची अवस्था आहे.
उत्तर द्याहटवाआपली मातृभाषा टिकावी या करता मुलानां मराठीतून शिक्षण द्यावे नाही तर ही भाषा मृत होण्यास वेळ लागणार नाही
उत्तर द्याहटवाआपली मातृभाषा टिकावी या करता मुलानां मराठीतून शिक्षण द्यावे नाही तर ही भाषा मृत होण्यास वेळ लागणार नाही
उत्तर द्याहटवा